ताजा खबरे:
*जि.प.नंदुरबार अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक'नियुक्तीचे आदेश वाटप*
*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*चॅट जीपीटी, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स मुळे विचारांचे यांत्रिकीकरण चिंतीत करणारे-राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ.सोमनाथ वडनेरे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*चॅट जीपीटी, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स मुळे विचारांचे यांत्रिकीकरण चिंतीत करणारे-राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ.सोमनाथ वडनेरे*

  • Share:

*चॅट जीपीटी,आर्टिफिशीयल इंटेलिजन्समुळे विचारांचे यांत्रिकीकरण चिंतीत करणारे-राष्ट्रीय मीडिया संमेलनात डॉ.सोमनाथ वडनेरे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आबू रोड-सोशल मीडियाचा अविवेकी वापर, चॅट जीपीटी, कृतीम बुद्धीमत्ता अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स यामुळे मानव समाज विचारांच्या यांत्रिकीकरणाच्या दिशेने जात असून हे माध्यमातील सर्वांत चिंताजनक अभिसरण आहे. यासाठीच माध्यमांनी मूल्याधिष्ठीत समाज निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माऊंट आबू येथे ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागामार्फत राष्ट्रीय मीडिया संमेलनात जळगाव येथील डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले. जागतिक शांती आणि सदभावनेसाठी सशक्त मीडिया विषयावर भारत आणि नेपाळ देशातील 1500 पत्रकारांचे माध्यम संमेलन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रानंतरच्या नियोजन सत्रात सोशल मीडियाचा समाजावरील प्रभाव या विषयावर मंथन करण्यात आले. मुख्य बीज भाषण जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले. 
`टुल्स` दोषी नसून `युजर` दोषी.
मुख्य संबोधनात त्यांनी सोशल मीडियाचा अविवेकी वापर, कृतिम बुद्धीमत्ता आणि चॅट जीपीटी सारख्या साधनांच्या वापरामुळे जागतिक पातळीवर होणा·या मानव समाजावरील प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली. टेक्नॉलॉजीचे `टुल्स` अर्थात साधने दोषी नसून `युजर` अर्थात वापरकर्ता दोषी असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी बी.के. निकुंज, राष्ट्रीय समन्वयक मीडिया प्रभाग, मुंबई यांनी माध्यमांनी भाव आणि भावनाच्या आधारे वृत्तांकन करावे याबद्दल आपले विचार व्यक्त केले. या सत्रात वाय. बाबजी, पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, हैद्राबाद, बी.के. नाथूमल, कटक, डॉ. पी. शिवस्वरुप, इग्नो, नागपूर, डॉ. आरती त्रिपाठी, पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, दिल्ली, डॉ. कमलेश मीना, पटना, डॉ. अवा शुक्ला, अहमदाबाद आदिंनी आपले समायोचित विचार मांडलेत. सत्राची अध्यक्षता डॉ. नरेंद्र कौशिक, जयपूर पत्रकारिता विद्यापीठ यांनी केले. बी.के. योगीनी, अजमेर यांनी सत्र संचलन केले. महाराष्ट्रातून चारशे माध्यम प्रतिनिधींचा सहभाग. राष्ट्रीय मीडिया संमेलनात महाराष्ट्र राज्यातून विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, एफ. एम. रेडिओ, कम्युनिटी रेडिओ, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, समाज माध्यमे आदि मिळून सुमारे 400 हून अधिक मीडिया प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला असून महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयनाचे काम डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे. 12 सप्टेंबरपर्यंत चालणार्या राष्ट्रीय संमेलनात अनेक माध्यम तज्ज्ञ, प्रकाशक, मालक यांनी जागतिक शांतीसाठी माध्यमांच्या योगदानाबद्दल चर्चा करतील.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जि.प.नंदुरबार अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक'नियुक्तीचे आदेश वाटप*
August, 26 2026
*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
August, 25 2026
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
August, 25 2026
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
August, 25 2026
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
August, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज