*नालासोपाऱ्यात स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे भारतीय घटनेतील आर्टिकल 19 मधील दुरुस्तीसाठी सह्यांची मोहीम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नालासोपाऱ्यात स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे भारतीय घटनेतील आर्टिकल 19 मधील दुरुस्तीसाठी सह्यांची मोहीम*
*नालासोपाऱ्यात स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे भारतीय घटनेतील आर्टिकल 19 मधील दुरुस्तीसाठी सह्यांची मोहीम*
नालासोपारा(प्रतिनिधी):-भारत हे एक भाषिक संघराज्य आहे. म्हणून भारताला राष्ट्रभाषा नाही. भारतीय घटनेतील आर्टिकल 19 नुसार भारतीय नागरिकाला कुठेही संचार करण्याचे, स्थायिक होण्याचे, नोकरी धंदा व्यवसाय करण्याचे अधिकार मिळाले आहेत. या अधिकारात अविकसित राज्यातील लोक मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले व होत आहेत. हे चक्र असेच सुरू राहिले तर येत्या काही दशकात महाराष्ट्रात मराठी लोक अल्पसंख्यांक झालेले असतील व त्याचे परिणाम विधानसभेमध्ये दिसून येतील. कारण महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेल्या लोकांनी, संख्या वाढताच मतदारसंघ तयार करून, स्वतःचे नेते तयार केले आहेत. आणि याच नेत्यांच्या आणि वाढलेल्या संख्येच्या जोरावर स्थलांतरित लोक महाराष्ट्रातील मराठी नेत्यांवर दबाव टाकत असतात आणि त्यांना पाहिजे त्या सोयी सवलती मिळवीत असतात. एवढेच नव्हे तर त्यांनी संख्येच्या जोरावर स्थानिक मराठी भाषा व संस्कृतीला नाकारायला सुरुवात केली आहे. हे आपल्याला आताच्या रिक्षा टॅक्सीवाल्यांना मराठी बोलणे अनिवार्य केलेल्या प्रकरणातून दिसून आले आहे. तसेच हे लोक महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना नोकऱ्या नाकारताना दिसतात, घरे नाकारताना दिसतात. तर एक अल्पसंख्यांक समाज मराठी लोकांना खाद्य संस्कृतीवरून घरे नाकारत असतो. काही वर्षांपूर्वी दहिसर मधील एका सोसायटीमध्ये नाट्य निर्मात्याच्या पत्नीला आणि छोट्या मुलीला, या लोकांनी मांसाहार करतात म्हणून मारहाणही केली होती. हेच लोक अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये, कामकाजात मराठी भाषेला नाकारत असतात. नुकत्याच बोरीवली येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये मराठी सभासदांना निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले. या सर्व प्रकरणांची दखल घेत महाराष्ट्रात येणारे लोंढे प्राधान्याने थांबवणे आवश्यक आहे, हे ओळखून स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आर्टिकल 19 मध्ये दुरुस्ती मागत असून, कोणत्याही राज्यात स्थलांतर करायचे असेल तर त्या राज्याची परवानगी घ्यावी, असा व्हिसा कायदा करावा. तसेच प्रत्येक राज्यातील निवडणुका व मतदान हक्क, फक्त त्या राज्यातील नागरिकांना मिळाले पाहिजेत व त्यांनाच शासकीय सोयी सवलती मिळाल्या पाहिजेत, यासाठी भारताला द्विनागरिकत्व कायदा करावा, अशी मागणी करत आहे असे संघटनेचे सरचिटणीस आमरेश पाथरे यांनी नालासोपारा येथे 4 व 5 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या सह्यांच्या मोहिमेच्या वेळी सांगितले. नालासोपारातील या दोन दिवसांच्या सह्यांच्या मोहिमेमध्ये जवळपास चारशे हून अधिक लोकांनी सहभाग नोंदविला. यावेळी काही लोकांनी या विषयावर प्रतिक्रिया ही दिल्या. आर्टिकल 19 मधील दुरुस्तीसाठी जनमत तयार करण्यासाठी, येत्या 1 मे 2027 रोजी मुंबई मध्ये महामोर्चा काढण्याचे सुतोवाच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मसुरकर यांनी केले आहे. यासाठीच विविध विभागंमध्ये जनजागृतीच्या मोहिमा संघटनेतर्फे राबविण्यात येत आहेत. या सह्यांच्या मोहिमेच्या वेळी संघटनेचे जयराम वीर, कृष्णा भरत सावंत भोसले, राजेश राणे, संजय धुरी, जेष्ठ नागरिक समाजसेवक विजू, जितेंद्र चोरगे, युसुफ कुरेशी, मनोज वैती आदी पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते, स्थानिक मराठी लोक सामिल झाले होते.



