*देवरे विद्यालयातील क्रीडापटूंनी मिळवले घवघवीत सुयश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयातील क्रीडापटूंनी मिळवले घवघवीत सुयश*
*देवरे विद्यालयातील क्रीडापटूंनी मिळवले घवघवीत सुयश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या मार्फत आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा प्रकारांमध्ये घवघवीत सुयश संपादित केले आहे.त्यात मानसी प्रकाश पाटील हिने 100 मी धावणे स्पर्धेत तालुक्यातून प्रथम तसेच तेजस्विनी अविनाश पाटील 3 कि.मी.चालणे स्पर्धेत तालुक्यातून प्रथम मानसी प्रकाश पाटील गोळा फेक मध्ये तालुक्यातून द्वितीय क्रमांक तर
कृष्णा विजय पाटील याने 5 कि.मी.चालणे स्पर्धेत तृतीय व
तुषार रामचंद्र पाटील याने 600 मी धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला,चिरंजीव हरीश कुमार सुनील कोळी याने बुद्धिबळ स्पर्धेत चार राऊंड मध्ये सुयश संपादन केले. तसेच मोहित मुकेश मराठे, यशराज सुकदेव मराठे, विराज विनोद ठाकरे, सौरभ ज्ञानेश्वर पाटील यांनी 4× 100 रिले स्पर्धेत तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. यशस्वीतांना क्रीडा शिक्षक व्ही.बी. अहीरे, एम.एस. मराठे, एस.एच. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, सचिव नरेंद्र देवरे, कोषाध्यक्ष सतीश देवरे शालेय समितीच्या अध्यक्षा शैलजा देवरे संस्थेचे सर्व पदाधिकारी, देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, ग्रामस्थ, विखरण, नाशिंदा, बोराळा, खापरखेडा,
खोंडामळी परिसरातील गावकरी, पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांचे कौतुकासह अभिनंदन करण्यात येत आहे.



