*'स्वाधार' योजनेसाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे बंधनकारक-सुंदरसिंग वसावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'स्वाधार' योजनेसाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे बंधनकारक-सुंदरसिंग वसावे*
*'स्वाधार' योजनेसाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे बंधनकारक-सुंदरसिंग वसावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 'स्वाधार' योजना राबवण्यात येते. जिल्हा आणि तालुका स्तरावर राबविल्या जाणाऱ्या या योजनेच्या नियमांत बदल करण्यात आले असून, 2026-27 या शैक्षणिक वर्षात लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आता सर्वप्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. अर्ज करण्याची पद्धत आणि मुदत,
स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधी शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या ऑनलाईन https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रम: अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून पर्यंत आहे. 11 वी, 12 वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम: अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै पर्यंत आहे. योजनेचे महत्त्वाचे नियम, प्रवेश न मिळाल्यास स्वाधार: जर विद्यार्थ्याला गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तरच तो विद्यार्थी 'स्वाधार' योजनेसाठी पात्र ठरेल व अर्ज करू शकेल. अर्ज न केल्यास नुकसान: जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत, त्यांना वसतिगृह आणि स्वाधार या दोन्ही योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. नियम शिथिलता: ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही, तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. भविष्यात स्वाधार योजनेचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावेत, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी
शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



