*जेष्ठ नागरिकांच्या जीवनात सुखाचे वारे; शहादा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते 'वयोश्री' उपकरणांचे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जेष्ठ नागरिकांच्या जीवनात सुखाचे वारे; शहादा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते 'वयोश्री' उपकरणांचे वाटप*
*जेष्ठ नागरिकांच्या जीवनात सुखाचे वारे; शहादा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते 'वयोश्री' उपकरणांचे वाटप*
शहादा(प्रतिनिधी):-केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'राष्ट्रीय वयोश्री योजने'मुळे ग्रामीण भागातील गरजू ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळत आहे. शहादा येथे या योजनेअंतर्गत तालुक्यातील 1653 पात्र लाभार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक सहाय्यक साधने आणि उपकरणांचे नुकतेच उत्साहात वाटप करण्यात आले. आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते हे साहित्य प्रदान करण्यात आल्याने ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमलले. दैनंदिन जीवन सुसह्य करण्याचा संकल्प घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नागरिकांचे उतारवयातील जीवन सुसह्य व्हावे आणि त्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, या उदात्त हेतूने 'राष्ट्रीय वयोश्री योजना' सुरू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावी अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. याच साखळीतून शहादा येथील संत सेना नाभिक समाज मंगल कार्यालय येथे 1653 वयोवृद्ध आणि दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या शिबिरात शारीरिक व्याधींनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठांना त्यांच्या गरजेनुसार खालील साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. चालताना आधार मिळावा यासाठी वॉकर व काठी,दिव्यांग आणि गंभीर आजारी ज्येष्ठांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी व्हीलचेअर,ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी कमोड टॉयलेट चेअर, कंबरदुखी आणि मणक्याच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी पाठीचे पट्टे अशा सहाय्यक उपकरण व विविध साहित्यांचे मोफत वाटप करण्यात येऊन सर्व ज्येष्ठ नागरिकांची वैद्यकीय तपासणी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली या कार्यक्रमाला खासदार गोवाल पाडवी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, प्रदेश सदस्य विनोद जैन, वयोश्री योजनेचे महाराष्ट्र चे प्रमुख के डी गोटे, डॉ किरण पावरा, तालुका अध्यक्ष नितिन पाटील विश्वास ठाकरे, मोतीलाल जैन, विवेक पाडवी, महिला मोर्चा शहराध्यक्ष वंदना भावसार, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, सुनिल चव्हाण, सुभाष वाघ, शहर महामंत्री प्रशांत कदम अजबसिंग गिरासे, स्विय्य सहाय्यक हेमराज पवार, अनिल ठाकरे, प्रितेश भावसार, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, लाभार्थी व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या या मदतीमुळे वयोवृद्ध नागरिकांनी समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत. कोट "आपले ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा अनुभव आणि आधारस्तंभ आहेत. त्यांना उतारवयात कोणाच्याही आधाराची गरज भासू नये आणि त्यांनी सन्मानाने जगावे, हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. ही योजना प्रत्येक गरजू घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले.



