ताजा खबरे:
*मिशन हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन:चिमुकल्या शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने सर्व थक्क*
*सोरापाडा येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सिद्ध पादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न*
*स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ-विवेक चव्हाण*
*कंत्राटी पद्धतीने वाहन भाड्याने घेण्यासाठी, इच्छुक वाहनधारकांनी 26 डिसेंबरपर्यंत निविदा सादर करावे- राज्यकर उपायुक्त किशोर चौरे*
*स्व.बटेसिंग रघुवंशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सीसीटीव्हीसह सर्व उपाययोजना अमलात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावणार; माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे व्यापारी बांधवांना आश्वासन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सीसीटीव्हीसह सर्व उपाययोजना अमलात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावणार; माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे व्यापारी बांधवांना आश्वासन*

  • Share:

*सीसीटीव्हीसह सर्व उपाययोजना अमलात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावणार; माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे व्यापारी बांधवांना आश्वासन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-संशयावरून पोलिसांनी सराफांना सरळ ताब्यात घेण्यासंदर्भातील कायद्यात शिथिलता आणली जावी यासाठी सरकारी स्तरावर वेगाने पाठपुरावा केला जाईल, सराफ बाजारातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याच्या संदर्भाने सीसीटीव्ही सह सर्व उपाययोजना अमलात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावली जाईल तसेच सुवर्णकार समाज भवन उभारणीतील सर्व अडचणी तत्परतेने सोडवल्या जातील, असे भारिव आश्वासन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरातील सराफ बाजारपेठेतील भेटी प्रसंगी दिले.  महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरातील सर्व भागांमध्ये जाऊन लोकांशी संवाद करण्यासाठी आणि समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी जनसंवाद उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत जय हिंद कॉलनी परिसरानंतर त्यांनी सोनार खुंट परिसरात भेट दिली आणि सराफ बाजारातील सर्व व्यापारी बांधवांशी एकत्रित बसून चर्चा केली. उपस्थित व्यापारी बांधवांनी विविध समस्या याप्रसंगी मांडल्या. सराफ बाजारपेठेमध्ये सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून त्यासाठी सीसीटीव्ही आवश्यक असताना आतापर्यंत पाहिजे तसा बंदोबस्त झालेला नाही. कुठेही चोरी झाल्यानंतर चोरीचे दागिने खरेदी केल्याच्या संशया खाली सर्वप्रथम सोने चांदी व्यापाऱ्यांना बिनपुराव्याचे ताब्यात घेतले जाते परिणामी संबंध नसलेल्या प्रकरणात सुद्धा व्यापाऱ्यांना मनस्ताप झेलावा लागतो आणि वेळेची तसेच आर्थिक हानी सोसावी लागते. म्हणून सोने चांदी विक्रेत्यांना पोलिसांनी सरळ ताब्यात घेण्याविषयीच्या कायदे नियमात योग्य तो बदल घडवण्यासाठी राज्य सरकारकडे बाजू मांडली जावी, असे उपस्थित व्यापारी बांधवांनी सांगितले. त्याचबरोबर निधी मंजूर असतानाही रखडलेले समाज भवन, रस्ते, वाहतूक नियमन आणि तत्सम विषय देखील मांडण्यात आले.  त्यावर बोलताना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आश्वस्त केले की, सोने चांदी व्यापारी तथा विक्रेते यांना पोलिसांनी सरळ ताब्यात घेण्या संदर्भाने कायद्यात योग्य ती शिथिलता आणली जावी यासाठी मुख्यमंत्री यांची भेट घेऊ. याच्यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत या संदर्भाने संकेत देण्यात आले होते अशी माहिती देऊन डॉक्टर विजयकुमार गावित पुढे म्हणाले की, येत्या पाच वर्षात शहरवासीयांच्या कोणत्याही समस्या शिल्लक राहणार नाही याकडे मी व्यक्तिगत लक्ष देणार आहे. याच्यापूर्वी कोणत्याही नेत्याने दिलेला नाही इतका निधी प्रत्येक समाजाच्या समाजभावनासाठी आपण मिळवून दिला. सुवर्णकार समाज भवन उभारणीसाठी याच्यापूर्वीच निधी मंजुरी मिळवली आहे तथापि ज्या काही पूर्तता राहिल्या असतील त्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. सीसीटीव्ही बसवले जावे यावर मी स्वतः आग्रही आहे म्हणूनच एक वर्षांपूर्वी डीपीडीसी मिटिंग मध्ये संबंधितांना सूचना करण्यात आल्या होत्या. नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांना योग्य ती पूर्तता लवकरात लवकर करण्यास सांगण्यात आलेले आहे असे याप्रसंगी डॉक्टर गावीत म्हणाले. या बैठकीला सराफ व्यापारी बांधव दिलीप सराफ, मनोज श्रॉफ, पांडुरंग सराफ, सत्यवान सोनार, सुमित सराफ, राजू सोनार, देवेंद्र सोनार, भरत सोनार, चंद्रशेखर सोनार, मोरेश्वर सोनार, जयेश माहेश्वरी, आशिष सोनार, राजेंद्र सोनार, जिग्नेश सोनार, दर्शन सोनार, मनोहर सराफ, गजेंद्र सोनार, सचिन सोनार, मनोज भंसाली, आकाश चौधरी, निर्मल जैन गोकुळ सोनार आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मिशन हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन:चिमुकल्या शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने सर्व थक्क*
December, 19 2025
*सोरापाडा येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सिद्ध पादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न*
December, 19 2025
*स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ-विवेक चव्हाण*
December, 19 2025
*कंत्राटी पद्धतीने वाहन भाड्याने घेण्यासाठी, इच्छुक वाहनधारकांनी 26 डिसेंबरपर्यंत निविदा सादर करावे- राज्यकर उपायुक्त किशोर चौरे*
December, 19 2025
*स्व.बटेसिंग रघुवंशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन*
December, 19 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज