*अंबापूर येथे आनंद बाजार, के.डी. गावित माध्यमिक विद्यालय अंबापुर येथे आनंद बाजार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अंबापूर येथे आनंद बाजार, के.डी. गावित माध्यमिक विद्यालय अंबापुर येथे आनंद बाजार*
*अंबापूर येथे आनंद बाजार, के.डी. गावित माध्यमिक विद्यालय अंबापुर येथे आनंद बाजार*
तळोदा(प्रतिनिधि):-आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या सप्ताहामध्ये क्रीडा स्पर्धा फनी गेम रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा रंगभरण स्पर्धा ग्राम स्वच्छता व सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. आनंद बाजाराचे उद्घाटन अंबापुर गावाचे लोकनियुक्त सरपंच वासुदेव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच अर्चना महाले शामू चौरे शा. व्य. स. उपाध्यक्ष पुनाजी चौरे ग्रा. पं. सदस्य धरमदास गवळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आंनद बाजारात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळीविद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते या स्टॉलवर खवय्यांनी मनमुरात आनंद लुटला. आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहार केल्याने व्यावहारिक ज्ञानात भर पडली. तसेच कमवा व शिका हे उद्दिष्ट ही साध्य झाले, कार्यक्रम मुख्याध्यापक बापू गवते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धांत खाडे यांनी केलेफलक लेखन दीपक पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश पाटील, योगेश शिंपी, सुनील दाभाडे, हेमांगी पाटील, रेश्मा गावित, सागर शर्मा, राजेंद्र चौरे यांनी परिश्रम घेतले.