*जेष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्री राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जेष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्री राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित*
*जेष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्री राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित*
नाशिक(प्रतिनीधी):-पत्रकारांच्या विविध प्रश्नांनावर कार्यरत असलेल्या नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पत्रकार संघातर्फे नाशिक येथील टोरायझोन अकॅडमी सी.बी. एस.सी स्कूल सभागृहात राष्ट्रीय स्तरावर पत्रकार मेळावा व राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कारांचे वितरण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र देशपांडे हे होते. प्रास्ताविक भाषणात सुधाकर साळी यांनी संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला याप्रसंगी महाराष्ट्र व इतर राज्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या विशेषता पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार शॉल, प्रमाणपत्र व फेटा बांधून यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यात पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक राजेन्द्र लकेश्री यांच्या 50 वर्षांच्या कार्याची विशेष दखल घेवून त्यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार देवून विशेष सन्मानित करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पत्रकार संस्थेच्या (संघ) राष्ट्रीय सल्लागार पदी दोन वर्षांसाठी नियुक्तीचे पत्र मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण, राजेश उपासनी मॉडेल, डॉ. ज्योती शिंदे, दिवाळी अंकाचे संपादक दिनकर शिलेदार, दै. सामनाचे मुख्यसंपादक मनोज शिंदे (सूरत) अँड.नितीन ठाकरे सौंदर्य सम्राज्ञी निशीगंधा कापडणीस, ओमप्रकाश रावत, लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण इत्यादि मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आदि राज्यातून आलेल्या राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शेवटी उपस्थितांचे आभार सौ. कृत्तिकाजेष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्री राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित
=====================
नाशिक :- (प्रमोद तरळ) पत्रकारांच्या विविध प्रश्नांनावर कार्यरत असलेल्या नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पत्रकार संघातर्फे नाशिक येथील टोरायझोन अकॅडमी सी.बी. एस.सी स्कूल सभागृहात राष्ट्रीय स्तरावर पत्रकार मेळावा व राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कारांचे वितरण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र देशपांडे हे होते.
प्रास्ताविक भाषणात श्री सुधाकर साळीसर यांनी संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला याप्रसंगी महाराष्ट्र व इतर राज्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या विशेषता पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार शॉल, प्रमाणपत्र व फेटा बांधून यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
त्यात पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक श्री राजेन्द्र लकेश्री यांच्या ५० वर्षांच्या कार्याची विशेष दखल घेवून त्यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार देवून विशेष सन्मानित करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पत्रकार संस्थेच्या (संघ) राष्ट्रीय सल्लागार पदी दोन वर्षांसाठी नियुक्तीचे पत्र मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण,राजेश उपासनी मॉडेल, डॉ. ज्योती शिंदे, दिवाळी अंकाचे संपादक दिनकर शिलेदार, दै. सामनाचे मुख्यसंपादक मनोज शिंदे (सूरत) अँड.नितीन ठाकरे सौंदर्य सम्राज्ञी निशीगंधा कापडणीस, ओमप्रकाशजी रावत, लक्ष्मण सावजी,अजित चव्हाण इत्यादि मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आदि राज्यातून आलेल्या राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
शेवटी उपस्थितांचे आभार सौ. कृत्तिका संदिप मराठे यांनी मानले.