*एकलव्य विद्यालयात नवीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात नवीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न*
*एकलव्य विद्यालयात नवीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न*
नंदूरबार(प्रतिनीधी):-एकलव्य विद्यालय व नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात नवीन कायदेविषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पूर्वीच्या कायद्यांची नावे व आत्ता बदललेली नावे सांगितली तसेच एक जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता या नावाने नवीन कायदा जम्मू काश्मीर सहित संपूर्ण भारतात लागू झालेला आहे. या कायद्याचे प्रमुख कलमे व त्या अंतर्गत असलेली प्रावधाने त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. सायबर क्राईम कायद्याची माहिती सांगत असताना विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा, कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नये, आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नये व असे करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करावे असे आवाहनही त्यांनी केले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये सामील होणाऱ्यांना भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते असेही त्यांनी सांगितले. आर्थिक फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार विद्यार्थ्यांना सांगून त्यापासून कसे दूर राहता येईल याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, उपमुख्याध्यापिका शैलजा कापडिया, पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र माळी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले.