ताजा खबरे:
*गुरुपौर्णिमा महोत्सव 2025– राष्ट्रप्रेम जागवणारा प्रेरणादायी उपक्रम*
*गुलाआंबा ते केलखाडी नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावानागेश पाडवी*
*खरवते येथील विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे दि. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव*
*राजापूर तालुका महसूल संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर घडशी यांची बिनविरोध फेरनिवड*
*नंदुरबार येथे सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉक्टर दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नाशिक विभागीय आयुक्त यांना नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नाशिक विभागीय आयुक्त यांना नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात निवेदन*

  • Share:

*नाशिक विभागीय आयुक्त यांना नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत नंदुरबार जिल्हा प्राथमिक प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने नाशिक विभागीय आयुक्त  प्रवीण गेडाम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रलंबित प्रश्न बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी तातडीच्या प्रश्नी कार्यवाहीबाबत नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, शहादा तालुका अध्यक्ष तुकाराम अलट यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. या मांडण्यात आलेल्या मागण्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभाग जि. प. शिक्षणाच्या डिजिटायजेशनचे मोठे आव्हान शिक्षण व्यवस्थेसमोर आहे. त्याच वेळी पायाभूत सुविधांचा प्रश्नही मोठा आहे. अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. आदिवासी व दुर्गम भागात स्थानिक बोली भाषा वेगळी असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत येणारी अडचण विचारात घेवून त्यात सुलभता आणण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधना येण्याकरीता स्थानिक बोली भाषा अवगत असलेल्या शिक्षण सेवकांची नियुक्ती करण्याबाबतच्या भरती करण्यात यावी. आदिवासी भागात आजही शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक पदे रिक्त आहेत. या प्रश्नांकडे आता विशेष लक्ष दिले जावे. शासनाने रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे. शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ देणे संदर्भात विभागीय आयुक्त नाशिक यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. हजारो किलोमीटर अंतरावर कुटुंबापासून दूर राहून सेवा करणाऱ्या शिक्षकांसाठी 3 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाद्वारे शासन निर्णय करून अशा शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदेने एक आगाऊ वेतनवाढ देणे संदर्भात आदेशित केले आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता नव्याने गृहीत धरल्याने ते बदलून आलेल्या जिल्हा परिषदेत सेवा कनिष्ठ ठरतात त्या बदल्यात शासनाने त्यांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचे ठरविले आहे. या शासन निर्णयानुसार जे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने बदलून नंदुरबार जिल्हा परिषदेत आलेले आहेत, त्यांना अद्यापपर्यंत या शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आली नाही. यामुळे हजारो अंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकावर अन्याय होत असल्याची बाब यावेळी प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त यांचेसमोर मांडली. याबाबत लवकरच जिल्हा परिषद नंदुरबारला आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी आश्वासन दिले. शासन निर्णय 21 जून 2023 अनुसार जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वी पासून दुर्गम क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी, अशी तरतूद आहे. नवीन शिक्षक भरती सुरु झाली असून जे शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छूक आहेत त्यांच्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित करावे, अशी मागणी उक्त निवेदनान्वये करण्यात आलेली आहे. भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्याच्या पगारातून जीपीएफ कपात करण्यात आलेली रक्कम आहे. जोपर्यंत कर्मचारी नोकरी करत असतो तोपर्यंत त्याच्या पगारामधून जीपीएफ कपात होत राहते. नोकरी सोडल्यावर अथवा बदल झाल्यांनतर जीपीएफ खाते ट्रान्सफर करणे किंवा ते बंद करता येते व त्या तारखेपर्यंतची सर्व रक्कम व्याजासह कर्मचाऱ्याच्या मिळते. ही रक्कम करमुक्त असते. वेळेवर पैसे काढण्याचा पर्याय ईपीएफओ खात्याचा वापर बँक खात्याच्या रूपात वापर करता येत नसला तरी, वैद्यकीय उपचारांसह, गृह कर्ज परतफेड आणि शैक्षणिक खर्च यासारख्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी ठराविक कालमर्यादेंतर (5 ते 10 वर्षे) आंशिक पैसे काढण्याची सुविधा आहे. परंतु चार वर्षापासून हिशोब पावत्या मिळाल्या नसल्यामुळे शिक्षकांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. दरवर्षी अखेरपर्यंतच्या हिशोब पावती देणे बंधनकारक आहे.  अशैक्षणिक कामापासून सुटका व्हावी. इतर मागण्यांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक सहकार्य, शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्राथमिक प्रहार शिक्षक संघटना नेहमीच पुढाकार घेत आहे. सध्या प्रशासनाकडे करण्यात आलेल्या मागण्यांमुळे अनेक शिक्षकांच्या तसेच प्राथमिक शिक्षण विभागातील अनेक वर्षांपासूनचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यासाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय, जि. प. प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासनाकडूनही सकारात्मक सहकार्य मिळत आहे. या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन, प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे. भविष्यातही शिक्षकांच्या प्रश्नी तत्पर राहू असंही मत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित यांनी व्यक्त केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गुरुपौर्णिमा महोत्सव 2025– राष्ट्रप्रेम जागवणारा प्रेरणादायी उपक्रम*
July, 05 2025
*गुलाआंबा ते केलखाडी नयामाळ रस्ता व नदीवर पुल बांधण्यात यावानागेश पाडवी*
July, 05 2025
*खरवते येथील विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे दि. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव*
July, 05 2025
*राजापूर तालुका महसूल संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर घडशी यांची बिनविरोध फेरनिवड*
July, 05 2025
*नंदुरबार येथे सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉक्टर दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*
July, 05 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज