*पाण्याच्या डब्यात एकाच वेळी तीन लहान बालकांचा दुर्दैवी अंत, अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावरील दुर्देवी घटना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पाण्याच्या डब्यात एकाच वेळी तीन लहान बालकांचा दुर्दैवी अंत, अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावरील दुर्देवी घटना*
*पाण्याच्या डब्यात एकाच वेळी तीन लहान बालकांचा दुर्दैवी अंत, अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावरील दुर्देवी घटना*
नंदूरबार(प्रतिनिधी):- नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या, नर्मदा काठपरिसरातील अक्कलकुवा तालुक्यातील गमनचा केलीपाडा येथे डबक्यात आंघोळीसाठी उतरलेल्या तीन लहान बालकांना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने, पाण्याच्या डब्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे, मृत बालकांमध्ये सुनील खेता वसावे, नितेश आंब्रे वसावे, शुभम कैलास वसावे अशी या मृत झालेल्या बालकांची नावे असून, दिनांक 9 जून 2026 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली असून, या घटनेची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्यात आली असून घटना घडवून बराचसा अवधी उलटला असताना देखील, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची शासकीय मदत अथवा दिलासा संबंधित मृत बालकांच्या नातेवाईकांना मिळाला नसल्याने, मोलगी येथील शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी रात्री उशिरा बालकांचे शव दाखल करण्यात आले होते, या अत्यंत गंभीर आणि वेदनादायी घटनेची कोणत्याही स्थानिक अधिकाऱ्याकडून दाखल घेण्यात आली नसल्याबद्दल, स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे, या घटनेबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, मृत बालकांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत, विशेष सहाय्य व शासनाच्या सर्व उपलब्ध योजनाचा लाभ देण्याची मागणी केली आहे, यासाठी तहसीलदार, महसूल प्रशासन, आदिवासी विकास विभाग, तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून, मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.



