*बिलगाव व अक्राणी वनविभागाच्या कारवाईत पिकअप वाहनासह साग जळाऊ लाकूड दोन लक्ष 36 हजार 378 रुपयांचा मुद्देमाल जप्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बिलगाव व अक्राणी वनविभागाच्या कारवाईत पिकअप वाहनासह साग जळाऊ लाकूड दोन लक्ष 36 हजार 378 रुपयांचा मुद्देमाल जप्त*
*बिलगाव व अक्राणी वनविभागाच्या कारवाईत पिकअप वाहनासह साग जळाऊ लाकूड दोन लक्ष 36 हजार 378 रुपयांचा मुद्देमाल जप्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील वनविभागाच्या संयुक्त कारवाईत दिनांक 8 जून 2026 रोजी रात्री वनक्षेत्रपाल बिलगांव व रेंजस्टाफ शासकीय वाहनातून धडगाव राजबर्डी, चिखली भूषा रस्त्यावर वनसंरक्षण करण्यासाठी रात्रीची गस्त घालीत असताना, रात्री 11 वाजेच्या दरम्यान मौजे बोरी परिसरातील रस्त्यावर पांढ-या रंगाची पिकअप वाहन क्र. MH 43 F 3207 हा जळाऊ लाकडाची वाहतूक करून, धडगांवकडे येत असताना आढळून आला, समोरुन शासकीय वाहन येतानाचे पाहुन पिकअप चालकाने शासकीय गस्ती घालणाऱ्या वाहनास उजव्या बाजूने जोरात धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वनक्षेत्रपाल, वाहनचालक व वनकर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने पिकअपचा 4 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत सिनेस्टाइलने पाठलाग करून, शिंदवाणी परिसरात पकडली. वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेला, वनकर्मचारी यांनी त्याचा पाठलाग केला परंतू मिळून आला नाही,
वनकर्मचारी यांनी बिलगांव व अक्राणी वनक्षेत्रातील वनकर्मचारी यांच्याशी संपर्क साधला व त्यांना तात्काळ घटनास्थळी बोलाविले व पिकअप क्र. MH 43 F3207 जप्त मुद्देमालासह धडगांव काष्ठ आगारात आणण्यात आला, पांढ-या रंगाची पिकअप किंमत अंदाजे रक्कम रु. 2 लाख 30 हजार व साग जळाऊ 3.40 घ.मी. किंमत रक्कम 6378 असे एकत्रित रक्कम रु. 2 लाख 36 हजार 378 मुद्देमालावर वनक्षेत्रपाल बिलगाव यांनी त्याच्या कडील जप्त शिक्का क्र. बि नं विः 1 हा उमटविला व पावतीने जप्त मुद्देमाल आगार रक्षक धडगाव याचे ताब्यात देण्यात आला. वनरक्षक माळ यांनी त्यांच्या कडील वनगुन्हा क्र. ओ 01 / 2026 दिनांक 8 जून 2026 अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) अ. फ. 26 (1.a) A, 41 (1), 42, 52 (1) अन्वये वन गुन्हा नोंदविण्यात आला. पूढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई धुळे वनवृत्त वनसंरक्षक श्रीमती निनु सोमराज, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, धुळे वनवृत्त विभागीय दक्षता अधिकारी राजेंद्र सदगिर, नंदुरबार वनविभाग अक्राणी सहाय्यक वनसंरक्षक
संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बिलगाव वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक दिलवरसिंग पावरा, अमरसिंग पावरा, आकाश पावरा, गिरधर पावरा, मंगेश वळवी, दिनेश वसावे, रोहिदास पावरा, राकेश पावरा, दारासिंग पावरा व वाहनचालक योगेश साळवे, हेमंत पावरा यांनी केली.



