*लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र किशोर ठूल यांना विशेष सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र किशोर ठूल यांना विशेष सन्मान*
*लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र किशोर ठूल यांना विशेष सन्मान*
रिंगणे(प्रतिनिधी):-उत्कृष्ट सेवा, समर्पण, व्यावसायिक उत्कृष्टता आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटीच्या (JNPA) प्रगती व प्रतिष्ठेमध्ये दिलेले मोलाचे योगदान याच्या गौरवार्थ, JNPA च्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे 29 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात किशोर रामचंद्र ठूल यांचा भारत सरकारच्या बंदरे, नौकावहन आणि जलमार्ग केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. मॅकॅनिकल इंजीनियर असणारे किशोर रामचंद्र ठूल हे लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र असून भारत सरकारच्या जवाहरलाल नेहरू बंदर या अत्याधुनिक बंदरामध्ये गेली 36 वर्षे कार्यरत आहेत. ते जवाहरलाल लाल पोर्ट प्राधिकरण च्या व्हीजीलन्स विभागात गेली तीन वर्षे कार्यरत असून व्हीजीलन्स ऑफीसर म्हणून केलेल्या विशेष कार्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.



