*"देवीहसोळ येथे 12 डिसेंबरला श्री आर्यादुर्गा - जाकादेवी यात्रोत्सवा निमित्त श्री देवी भंडारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"देवीहसोळ येथे 12 डिसेंबरला श्री आर्यादुर्गा - जाकादेवी यात्रोत्सवा निमित्त श्री देवी भंडारा*
*"देवीहसोळ येथे 12 डिसेंबरला श्री आर्यादुर्गा - जाकादेवी यात्रोत्सवा निमित्त श्री देवी भंडारा*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील देवीहसोळ मधील श्री सदगुरु दत्त आर्येश्वर सांप्रदाय (रजि.), मुंबई यांच्या वतीने आणि आर्यादुर्गा–जाकादेवी देवस्थान ट्रस्ट, देवीहसोळ यांच्या सहकार्याने दरवर्षी आयोजित केला जाणारा देवी भंडारा यंदाही उत्साहात पार पडणार आहे. सन 2023 पासून सुरू असलेली ही भक्तीसेवा यावर्षीही पूर्वपरंपरेप्रमाणे मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आली आहे. या वर्षीचा देवी भंडारा 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत श्री आर्यादुर्गा– जाकादेवी देवस्थान, देवीहसोळ येथे होणार आहे. भक्त, ग्रामस्थ व देवीमाता मोठ्या भक्तीभावाने मानणाऱ्या सर्व भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांप्रदायाचे सर्वेसर्वा संस्थापक रमेश कान्हेरे महाराज यांनी केले आहे.