*कृषि सखींनी घेतले नैसर्गिक शेती प्रमानीकरनाचे धडे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषि सखींनी घेतले नैसर्गिक शेती प्रमानीकरनाचे धडे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*
*कृषि सखींनी घेतले नैसर्गिक शेती प्रमानीकरनाचे धडे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*
नंदूरबार(प्रतिनिधी):-कृषि विज्ञान केंद्रात सुरु असलेल्या 19 व्या कृषि तंत्रज्ञान महोत्सवात नैसर्गिक शेतीच्या परिषदेमध्ये नैसर्गिक शेतीचे प्रमानीकरन दिनांक 5 डिसेंबर 2025, शुक्रवार रोजी दुपारच्या सत्रात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार, कु एस आर बाविस्कर, तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विभाग, नंदुरबार, बाळासाहेब खेमनार, नैसर्गिक शेती प्रमाणीकरण तज्ञ, श्रम विकास शेतकरी संस्था, संगमनेर, विषय तज्ञ उमेश पाटील, पी सी कुंदे व डॉ वैभव गुर्वे, कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शाश्रज्ञ राजेद्र दहातोंडे यांनी विवध उपक्रमाची माहिती सांगितली तसेच शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेतीचा वापर करून पिक पद्धतीत बदल करणे महत्वाचे आहे. तसेच बाजार व्यवस्थेसाठी नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण महत्वाचे आहे यावर त्यानी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिपक पटेल, प्रकल्प संचालक, आत्मा, नंदुरबार यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व सांगून ही काळाची गरज आहे. यासाठी कृषि सखींच्या महत्वाच्या वाटा आहे, आपापल्या समूह गावातील नैसर्गिक शेती करीत असलेल्या शेतकर्याच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचे काम हे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून कृषि सखींची मोठी जबाबदारी आहे असे त्यानी सांगितले. तांत्रिक मार्गदर्शन सत्रात उमेश पाटील, विषय विशेषज्ञ कृषिविद्या यांनी फक्त अत्पादन नव्हे तर त्या उत्पादनाचे प्रमाणीकरणाला खुप महत्व आहे. त्या साठी आपल्याला एकत्रित काम करणे गरजेचे आहे पिकात जीवामृत, बिजामृत, घनबिजामृत, निमास्त्र, आंतरपीक पद्धती, आच्छादन व वाफसा या सर्व नैसर्गिक शेतीच्या घटकांचा वापर करून नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून विषमुक्त अन्न कसे तयार करता येईल त्याच बरोबर शाश्वत पिकाचे उत्पादन घेता येणे शक्य आहे असे त्यानी सांगितले. तांत्रिक मार्गदर्शन सत्रात बाळासाहेब खेमनार यांनी आपल्या नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण कसे करावे यावर सादरीकरनासह मार्गदर्शन केले. यात प्रमाणीकरनाचे मानके लक्षात घेऊन उत्पादनाची प्रतवारी नुसार विक्री व्यवस्थे मध्ये नियोजनबद्ध काम करणे महत्वाचे आहे, तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकर्याचे प्रमाणपत्रासह नोंदणीसह अनिवार्य आहे त्याच बरोबर त्यानी प्रत्यक्ष गुगल फॉर्मचा माध्यमातून कृषि सखींनी नोंदनी कशी करावी या विषयावर सखोल मार्दर्शन केले. या प्रशिक्षणात जिल्यातील कृषि- सखी व आत्मा बीटीएम अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उमेश पाटील, विषय विशेषज्ञ कृषिविद्या व आभार प्रदर्शन प्रवीण चौहान, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी केले.



