*लाखापुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन*
*लाखापुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी फिरोज अली सय्यद यांनी बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार, समता-न्याय आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित विचार विद्यार्थ्यांना सांगितले. शिक्षण हाच सामाजिक परिवर्तनाचा मूलाधार असून प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा व समाजाचा विकास घडवावा, असा संदेश त्यांनी दिला. मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती, बाबासाहेबांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान तसेच सामाजिक न्यायासाठी केलेल्या कार्याचा माहितीपर आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद राणे यांनी केले तर आभार संजय पाटील यांनी मानले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. याप्रसंगी उपशिक्षक चंदू पाडवी, सुवर्णा कोळी, अश्विनी पाटील, विजय पवार, सागर पाडवी आदींनी परिश्रम घेतले.



