*नागझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नागझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न*
*नागझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न*
नवापूर(प्रतिनिधी):—डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त नागझरी येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड आर. टी. गावीत यांनी देशातील वाढत्या सामाजिक-आर्थिक विषमता,जल-जंगल-जमिनीवरील वाढते भांडवलवादी हस्तक्षेप आणि आदिवासी समाजासमोरील गंभीर प्रश्न यावर प्रकाश टाकत एकजुटीचे आव्हान केले. कार्यक्रमाच्या सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, महात्मा फुले लिखित ‘सत्याचा अखंड गायन’ करून करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भीमसिंग वळवी, अरविंद वळवी, कॉम्रेड कारणसिंग कोकणी, कॉमरेड रणजित गावीत, नकट्या गावीत, शीतल गावीत, दिलीप गावीत आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात कॉ. आर टी गावित यानी सांगितले की, “आज देशभरात आदिवासींच्या जल-जंगल-जमिनी कंपन्यांना विकण्याचा सपाटा सुरू आहे. दापूर कामोद वनक्षेत्र मेघा इंजिनिअर कंपनीला आणि देवळीपाडा –वागदी वनक्षेत्र उदचन विद्युत प्रकल्पाला हजारो हेक्टर जमीन सरकार विकत आहे. पिढ्यानपिढ्या कष्टाने जपलेल्या जमिनी आदिवासींना कोणतीही माहिती, पट्टा किंवा हक्क न देता कंपन्यांना दिल्या जात आहेत. त्यांनी आरोप केला की भांडवलदारांच्या फायद्यासाठी आदिवासी समाजात फुट पाडण्याचे धोरण राबवले जात असून, पेसा कायद्याचा गैरवापर करून तेढ निर्माण केली जात आहे. हजारो रिक्त सरकारी पदे, शिक्षित आदिवासी तरुणांची वाढती बेरोजगारी, आरोग्यसेवेची दयनीय अवस्था, शाळा बंद पडणे, शिक्षक भरतीचा अभाव, हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांचे संकट या प्रश्नांवर सरकार मौन बाळगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा सर्व खेळ भाजपप्रणित सरकार भांडवलदारांना जल -जंगल-जमिनी विकण्यासाठी करीत आहे. त्यामुळे आदिवासी क्रांतीवीर खाजा नाईक, बिरसा मुंडा, तंट्या मामा तसेच महात्मा फुले–सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी एकजूट होणे अत्यंत गरजेचे आहे. सत्यशोधक शेतकरी सभा राजकारणविरहित पद्धतीने आदिवासी व शेतकरी प्रश्नांवर लढा देत असून जल -जंगल-जमीन वाचवण्यासाठी आणि शेतमालाला हमीभाव मिळवण्यासाठी संघर्षरत आहे. सर्वांनी या लढ्याचा भाग होण्याचे आव्हान कॉ आत टी गावित यांनी सभेत उपस्थितांना केले.
सभेचे सूत्रसंचालन कॉम्रेड रामदास गावीत व देवसिंग गावीत यांनी केले. आभार प्रदर्शन तंटामुक्त अध्यक्ष यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश गावीतसह स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.



