ताजा खबरे:
*कृषि सखींनी घेतले नैसर्गिक शेती प्रमानीकरनाचे धडे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*
*लाखापुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन*
*नागझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न*
*शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाच्या श्वासात जिवंत आहेत-प्रा. डॉ.एम.एस.उभाळे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*

  • Share:

*शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्रात सुरु असलेल्या, 19 व्या कृषि तंत्रज्ञान महोत्सेवाची सुरवात उद्घाटनाणे झाली दिनांक 5 डिसेंबर 2024, शुक्रवार रोजी जागतिक मृदा दिवस/ नैसर्गिक शेती / रब्बी  पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले, प्रमुख अतिथी दिपक पटेल, प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार, कु एस आर बाविस्कर तंत्र अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कृषि विभाग नंदुरबार, बी बी शिंदे मृदातज्ञ चोपडा, दिलीप पाटील सेंद्रिय/नैसर्गिक शेती तज्ञ धुळे व शांताराम साकोरे कृषि संचालक अफार्म संस्था पुणे, बाळासाहेब खेमनार नैसर्गिक शेती प्रमाणीकरण तज्ञ श्रम विकास शेतकरी संस्था संगमनेर, विशेष अतिथी ललित पाठक सल्लागार मंडळ डॉ. हेडगेवार सेवा समितीचे नंदुरबार, सुखदेव माळी संचालक डॉ. हेडगेवार सेवा समितीचे नंदुरबार  आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शाश्रज्ञ राजेद्र दहातोंडे यांनी 19 वा कृषि तंत्रज्ञान महोत्सवात होणाऱ्या विवध उपक्रमाची माहिती सांगितली तसेच शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेतीचा वापर करून पिक पद्धतीत बदल करणे महत्वाचे आहे. सोबत जमीनीचे आरोग्य खूप महत्वाचे आहे यासाठी कृषि विज्ञान केंद्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. तसेच रबी पीक परिषद या निमित्ताने हरभरा व गहू पिकातील सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जमिनीचे आरोग्य व उत्पादनात वाढ होईल असे सांगितले. प्रमुख अतिथी दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व सांगून ही काळाची गरज असून यामुळे जमिनीचे आरोग्य टिकवता येईल. शाश्वत पिकाचे उत्पादन घेता येणे शक्य होईल. यादरम्यान राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात टप्या टप्याने कार्य सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. कु एस आर बाविस्कर यांनी माती परीक्षण यावर सांगताना विविध अन्नघटकांची गरज पिकाना असते त्यासाठी मातीचे आरोग्य टिकविले पाहिजे म्हणजे पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, कृषि विभाग च्या माद्यमातून विविध योजना राबविल्या जातात त्याच्या फायदा आपण सर्वानी घ्यावा असे त्यानी सांगितले. ललित पाठक यांनी कृषि विज्ञान केंद्राने कृषि तंत्रज्ञान महोत्सवाची परंपरा कायम ठेवली हे कौतुकास्पद आहे व हे शेतकर्यानसाठी महत्वाचे आहे असे उद्गार त्यानी आपल्या मार्गदर्शनात म्हटले. शांताराम साकोरे यांनी जिल्यात मोठ्या प्रमाणावर कृषि क्षेत्रात प्रगती करण्याचे काम कृषि विज्ञान केंद्राचे केले आहे, तसेच जमिनीचे आरोग्य व नैसर्गिक शेती ही आगामी काळात महत्वाची ठरणार आहे असे त्यानी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले यानी विषमुक्त शेतीसाठी भविष्यात नैसर्गिक शेती पद्धतीचा वापर करणे महत्वाचे आहे. दिवसेंदिवस जमिनीमधील मुलभूत घटक कमी होत चालले आहे. ते टिकवण्यासाठी नैसर्गिक शेती उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे आपल्या या भूमातेला वाचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे यासाठी या परिषदेच्या माध्यमातून आपण कराल, यासाठी या केंद्रातील शास्राज्ञाची मदत घेऊन एकत्रित काम करू या असे त्यानी  आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले. पहिल्या तांत्रिक मार्गदर्शन सत्रात डॉ. बी बी शिंदे, यांनी आपल्या 35 वर्षाच्या अनुभवातून खूप सारी उदाहरणे सांगताना आपल्या शरीराच्या आरोग्याच्या विचार करणे गरजेचे आहे कारण मातीच्या गुणधर्मावरच सर्व काही अवलंबून आहे, सध्याच्या हवामान बदलाच्या परिस्थितीत नैसर्गिक शेती पद्धतीचे महत्व सांगून जमीनीचे आरोग्य टिकवण्यासाठी सेंद्रिय कर्ब हा 2 टक्के असावा, जमिनीचे सामू उदासीन असावे, यासाठी प्रयन्त करावे लागतील त्याच बरोबर रबी हंगामातील पिकांसाठी नैसर्गिक शेती पद्धती फायद्याची आहे यावर सविस्तर माहिती दिली.
दुसऱ्या तांत्रिक मार्गदर्शन सत्रात दिलीप पाटील यांनी नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीतील महत्वाच्या बाबींवर भर देवून टप्प्या- टप्प्याने शेतक-यांनी याकडे वळावे असेही मत मांडले.
बाळासाहेब खेमनार यांनी उपस्थित कृषि सखीना नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण कसे करावे यावर सादरीकरनासह मार्गदर्शन केले.   
उमेश पाटील, विषय विशेषज्ञ कृषिविद्या यांनी जीवामृत, बिजामृत, घनबिजामृत, निमास्त्र, आंतरपीक पद्धती, आच्छादन व वाफसा या सर्व नैसर्गिक शेतीच्या घटकांचा कसा वापर करावा याविषयी मार्गदर्शन केले. यासाठी प्रत्येक शेतक-याकडे एक देशी गाय असणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले. मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसायला लागली. जमिनीचे आरोग्य आपल्याला अबाधित ठेवावे लागेल. त्यासाठी माती व परीक्षण जमिनीच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. यानुसार एकात्मिक अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करावे लागेल. यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्वाचा आहे या सोबतच गहू व हरभरा लागवड तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात नैसर्गिक शेतीत उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी गनेश पाटील, लोणखेडा ता. शहादा यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, कृषि सखी, सोबत विद्यार्थी, तसेच आत्मा बीटीएम अंतर्गत शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उमेश पाटील, विषय विशेषज्ञ कृषिविद्या व आभार प्रदर्शन प्रवीण चौहान, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व शेतकरी कार्यक्रम सहाय्यक मृदा यांनी घेतली तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार पद्माकर कुंदे, सौ. आरती देशमुख, डॉ. वैभव गुर्वे, डॉ. खुशाल राठोड तसेच विकास सहयोगी गीता कदम, कमलकिशोर देशमुख, दुर्गाप्रसाद पाटील, संदीप कुवर, किरण मराठे, रजेसिंग राजपूत, कैलास सोनवणे, कल्याण पाटील आणि जयवंत कापडे यांनी सहकार्य केले. या प्रसंगी जीवामृत, बिजामृत, घनजीवामृत, निमास्त्र याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कृषि सखींनी घेतले नैसर्गिक शेती प्रमानीकरनाचे धडे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*
December, 07 2025
*लाखापुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन*
December, 07 2025
*नागझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न*
December, 07 2025
*शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*
December, 07 2025
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाच्या श्वासात जिवंत आहेत-प्रा. डॉ.एम.एस.उभाळे*
December, 07 2025

थोडक्यात बातमी

*कृषि सखींनी घेतले नैसर्गिक शेती प्रमानीकरनाचे धडे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*
December, 07 2025
*लाखापुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन*
December, 07 2025
*नागझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न*
December, 07 2025
*शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*
December, 07 2025
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाच्या श्वासात जिवंत आहेत-प्रा. डॉ.एम.एस.उभाळे*
December, 07 2025

थोडक्यात बातमी

*कृषि सखींनी घेतले नैसर्गिक शेती प्रमानीकरनाचे धडे -दिपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार*
December, 07 2025
*लाखापुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन*
December, 07 2025

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज