*डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाच्या श्वासात जिवंत आहेत-प्रा. डॉ.एम.एस.उभाळे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाच्या श्वासात जिवंत आहेत-प्रा. डॉ.एम.एस.उभाळे*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाच्या श्वासात जिवंत आहेत-प्रा. डॉ.एम.एस.उभाळे*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-"महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी त्यांच्या विचारांची, संघर्षाची आणि मानवतेची आठवण जोपासण्याचा दिवस आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी वापरले. पाचशे वर्षांपासून होणारा अन्याय त्यांनी केवळ पन्नास वर्षात संपवला. त्यांनी मनुस्मृती ही पूर्वीची राज्यघटना जाळली तर संपूर्ण भारतीयांच्या उद्धारासाठी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. त्यांचे महापरिनिर्वाण आपल्याला शिकवण देते की, त्यांनी दिलेल्या विचारांना, अधिकाऱांना आणि स्वातंत्र्याला आपण जगत राहिलो, तरच त्यांचे महानिर्वाण पूर्ण होते. कारण ते आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात, श्वासात जिवंत आहेत" असे विचार प्रा.डॉ.एम.एस.उभाळे यांनी मांडले. ते श्रीमंत राजे दौलतसिंह रावल बी.एड. महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला होता. सर्वप्रथम पावरा सुकलाल यांनी कार्यक्रमाचा हेतू व रूपरेषा प्रास्ताविकातून स्पष्ट केली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.प्रमोद डी.बोरसे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. निकिता रावल, रूपाली बागुल व जयश्री ठाकूर या विद्यार्थिनींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित समयोचित मनोगते सादर केली. त्यानंतर प्रा.डॉ.एम.एस.उभाळे यांनी 'महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर अध्यक्षीय मनोगत सादर केले. सूत्रसंचालन सुकलाल पावरा तर आभार अभिव्यक्ती ओरसिंग पावरा यांनी केली. कार्यक्रमाचे नियोजनाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद डी. बोरसे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम.एस.उभाळे,प्रा.रवींद्र पाटील, प्रा.निशा ठाकूर, प्रा. रेवती बागुल,प्रा. सुनीता वळवी यांनी प्रयत्न केले. तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे,कृष्णा बागुल, अमर राजपूत व वीरपाल गिरासे सहकार्य केले.



