*नंदुरबार येथे 19 व्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त, कृषी प्रक्रिया आणि एफपीओ या विषयांवर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे 19 व्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त, कृषी प्रक्रिया आणि एफपीओ या विषयांवर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन*
*नंदुरबार येथे 19 व्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त, कृषी प्रक्रिया आणि एफपीओ या विषयांवर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शेतकरी सक्षमीकरणासाठी कृषी प्रक्रिया उद्योग आणि एफपीओचाच मार्ग 19 वा कृषी तंत्रज्ञान सप्ताह डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे 19 व्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त कृषी प्रक्रिया आणि एफपीओ या विषयांवर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. कृषी प्रक्रियेतून मूल्यवर्धन, गटशेती, एफपीओ उभारणी आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे जेष्ट सल्लागार ललित पाठक, प्रमुख अतिथी कुणाल ठाकूर, मंडळ कृषी अधिकारी, नंदुरबार, सौ. कांतागौरी बनकर, जिल्हा समन्वयक, माविम, नंदुरबार, मार्गदशन करण्यासाठी शशिकांत पाटील, अन्न प्रक्रिया तज्ञ कृषि विज्ञान केंद्र जालना आणि भगवान डोंगरे, चेयरमन, आयडियल अग्रोटेक शेतकरी उत्पादक कंपनी जालना आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्राचे शाश्रज्ञ जयंत उत्तरवार यांनी 19 वा कृषि तंत्रज्ञान महोत्सवात होणाऱ्या विवध उपक्रमाची माहिती सांगितली विशेषतः कृषी प्रक्रिया व शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे महत्त्व अधोरेखित केले. कृषी प्रक्रियेच्या माध्यमातून प्राथमिक कृषी उत्पादनाला मूल्यवर्धन मिळते, बाजारपेठेत चांगला दर मिळतो आणि शेतकऱ्यांचा नफा वाढतो. त्याचबरोबर, शेतकरी उत्पादक कंपनी हा आधुनिक कृषीव्यवस्थेतील अत्यंत प्रभावी मॉडेल असून, समूहशक्तीचा वापर करून खरेदी– विक्री, प्रक्रिया, साठवण, ब्रँडिंग व मार्केटिंग हे सर्व कार्य अधिक सक्षमपणे करता येते, असे त्यांनी सांगितले. एफपीओमुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेचा लाभ मिळतो कृषी विज्ञान केंद्राकडून या सर्व उपक्रमांना मिळणाऱ्या मार्गदर्शनाची माहितीही उपस्थित शेतकऱ्यांना दिली. एकूणच, 19 वा कृषि तंत्रज्ञान महोत्सव हा ज्ञान, तंत्रज्ञान आणि शेती व्यवसायातील नवसंधी यांचा संगम असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख अतिथी कुणाल ठाकूर यांनी PMFME आणि NFSM योजनांची शेतकऱ्यांना सोप्या भाषेत माहिती दिली. या योजना शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान, प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करतात. त्यांनी सांगितले की या योजनांचा योग्य वापर करून शेती व प्रक्रिया एकत्र करून जास्त उत्पन्न मिळवता येऊ शकते. तसेच सौ. सौ. कांताबाई बँकर यांनी MAVIM अंतर्गत महिलांसाठी उपलब्ध विविध योजनांची माहिती दिली. या योजनांमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळते. यामध्ये स्वरोजगार, प्रशिक्षण आणि छोटे उद्योग सुरू करण्यासाठी मदत दिली जाते. त्यांनी सांगितले की या योजनांमुळे महिलांचा सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण साधता येते. तांत्रिक मार्गदर्शन सत्रात - कृषी प्रक्रियेविषयी सविस्तर आणि सर्वांगीण माहिती शशिकांत पाटील, अन्न प्रक्रिया तज्ञ कृषि विज्ञान केंद्र जालना यांनी दिली. त्यांनी सांगितले की शेती उत्पादनाला बाजारपेठेत अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्राथमिक उत्पादनाचे टिकवण, साठवण, दर्जा सुधारणा, तसेच दीर्घकालीन विक्रीसाठी प्रक्रिया करणे हे आजच्या काळातील अत्यावश्यक घटक आहेत. यावेळी त्यांनी तूर डाळ मिलिंग प्रक्रियेपासून गव्हाचे पीठ उत्पादनापर्यंत विविध धान्य प्रक्रिया पद्धतींची माहिती दिली. तसेच आवळा कँडी, सीताफळ कुल्फी आणि आईसक्रीम, आंबा पल्प, स्क्वॅश यांसारख्या फळ प्रक्रिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. फळांचे उत्पादन हंगामी असले तरी योग्य प्रक्रिया तंत्रज्ञान वापरल्यास त्यांची टिकवणक्षमता वाढते आणि वर्षभर विक्री शक्य होते, यावर त्यांनी भर दिला. सोयाबीन प्रक्रियेविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. सोया दूध व पनीर तयार करण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी असून, कमी भांडवलात महिलांसाठी व लघु उद्योजकांसाठी ही उत्कृष्ट व्यवसाय संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय सोलर व इलेक्ट्रिक ड्रायर, यांचे महत्त्व तेव्हा अधोरेखित केले. यामुळे फळे, भाजीपाला, मसाले आणि हिरव्या पालेभाज्या वाळवून त्याचे मूल्यवर्धित उत्पादन तयार करता येते. कोल्ड स्टोरेज सुविधेमुळे नाशवंत माल सुरक्षित राहतो आणि बाजारभाव वाढेपर्यंत माल ठेवणे शक्य होते, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्रिक ज्ञानासोबतच त्यांनी शासकीय योजनांची विस्तृत माहितीही दिली. SMART, MAGNET, MSME, NHB, NHM, Stand-Up India यांसारख्या योजनांद्वारे प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अनुदान, कर्ज, प्रशिक्षण आणि तांत्रिक साहाय्य उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय सहाय्याचा योग्य वापर केल्यास ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळू शकते, असे ते म्हणाले. एकूणच, शशिकांत पाटील यांनी प्रक्रिया उद्योगाच्या संधी, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि योजनांविषयी दिलेला हा सविस्तर आढावा शेतकऱ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक ठरला. तांत्रिक मार्गदर्शन सत्रात भगवान डोंगरे, चेयरमन, आयडियल अग्रोटेक शेतकरी उत्पादक कंपनी जालना यांनी शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की FPC स्थापन केल्यास शेतकऱ्यांना सामूहिक ताकद मिळते आणि उत्पादन विक्रीमध्ये अधिक नियंत्रण राहते. गटशेतीमुळे जोखीम कमी होते आणि संसाधनांचा योग्य वापर करता येतो. प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांना जास्त मूल्यवर्धन व नफा मिळतो, तसेच फळे, भाजीपाला, धान्य व दूध यावर प्रक्रिया करून बाजारभाव वाढवता येतो. थेट परवाना प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना बाजारपेठेत थेट प्रवेश मिळतो, ज्यामुळे मध्यस्थ कमी होतो आणि नफा वाढतो. FPC चालवताना योग्य नियोजन, प्रशिक्षण, सामूहिक विपणन, ब्रँडिंग व निर्यात यांचा फायदा घेता येतो. त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादन व नफा दोन्ही वाढवण्यावर भर देण्याचे महत्त्व सांगितले.
कार्याक्रमाचे अध्यक्ष ललित पाठक यांनी कांदा व टोमॅटो सारख्या पिकांच्या दरातील चढ- उतारामुळे होणाऱ्या नुकसानीवर प्रकाश टाकला. या समस्येवर उपाय म्हणून प्रक्रिया उद्योग उभारण्याची, सक्रिय शेती करण्याची आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, कृषि सखी, सोबत विद्यार्थी, तसेच आत्मा बीटीएम अंतर्गत शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. आरती देशमुख, विषय विशेषज्ञ गृह विज्ञान व आभार प्रदर्शन दुर्गाप्रसाद पाटील वायपी-2, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार, पद्माकर कुंदे, उमेश पाटील, सौ. आरती देशमुख, डॉ. वैभव गुर्वे, डॉ. खुशाल राठोड तसेच विकास सहयोगी गीता कदम, कमलकिशोर देशमुख, दुर्गाप्रसाद पाटील, संदीप कुवर, किरण मराठे, रजेसिंग राजपूत, कैलास सोनवणे, कल्याण पाटील आणि जयवंत कापडे यांनी सहकार्य केले. या प्रसंगी जीवामृत, बिजामृत, घनजीवामृत, निमास्त्र याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.



