*एकलव्य विद्यालयात बाबासाहेबांना अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात बाबासाहेबांना अभिवादन*
*एकलव्य विद्यालयात बाबासाहेबांना अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालयात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी होते.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विद्यालयाचे उपशिक्षक धोंडीराम शिनगर म्हणाले की,
भारताच्या आर्थिक आणि सामाजिक जीवन घडणीत डॉक्टर बाबासाहेब यांचे योगदान हिमालया एवढे आहे आजचा आधुनिक भारत म्हणजे बाबासाहेबांच्या कामाची विचारांची किमया आहे. गोरगरिबांची परिस्थिती सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. जगातील अनेक घटनांचा अभ्यास करून त्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. आजही ही राज्यघटना जगात अव्वल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष अखिल जगाच्या सर्वांगीण प्रगतीचे दिशादर्शन करणारे नेते असतात त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भावसार यांनी तर आभार प्रदर्शन गौरीशंकर धुमाळ यांनी केले. व्यासपीठावर मिलिंद वडनगरे, टिका पाडवी उपस्थित होते.



