*जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी*
*जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान व आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते नेहरू यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. रघुवंशी म्हणाले की, “पंडित नेहरूंचे राष्ट्रनिर्माणातील योगदान इतिहासाच्या पानावर कायमस्वरूपी सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकतांत्रिक मूल्ये व आधुनिक भारताचा पाया त्यांनी भक्कम केला.” कार्यक्रमास विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी, महाविद्यालयाचे कुलसचिव सुदेशभैय्या रघुवंशी, उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पंडित नेहरू यांच्या सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय बांधणीतील कार्याचा सविस्तर आढावा प्रा. डॉ. दिनेश देवरे यांनी सांगितला. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. उपेंद्र धगधगे, डॉ. मनोज शेवाळे, प्रा. संदीप बडगुजर यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.



