*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित, श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालदिनानिमित्त मुलांसाठी फनी गेम्सचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राहुल मोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. शाळेतील शिक्षिक तुषार कुवर यांनी मनोगतातून नेहरूंच्या कार्यास उजाळा दिला. त्यानंतर नेहरूंचे स्वप्न साकार करणाऱ्या व भावी देशाची पिढी असलेल्या छोट्या चिमुकल्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फनी गेम्स घेण्यात आले. त्यात बादलीत चेंडू टाकणे, लगोरी, दोऱ्यात मनी ओवणे, फुगा फुगवणे, टिकली लावणे, राक्षसाच्या तोंडात चेंडू टाकणे, गाढवाला शेपूट लावणे इत्यादी प्रकारचे मजेशीर खेळ घेण्यात आले. चांगला वेळ, दिवस आणि सुंदर क्षण फक्त- बालपणीच मिळतात आणि या बालपणीच्या आठवणीने संपूर्ण आयुष्य काढता येते या युक्तीप्रमाणे त्यांनीही विविध खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. त्यात शाळेतील 685 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खरंच लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असतात याची प्रचिती त्यानिमित्ताने आली. संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेऊन सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजन सांस्कृतिक विभागाच्या शिक्षिका सोनाली वळवी यांनी केले. सूत्रसंचालन शाम शिंदे आभार सुनील वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



