*डॉ. समिधा नटावदकर यांची भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ. समिधा नटावदकर यांची भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी निवड*
*डॉ. समिधा नटावदकर यांची भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी डॉ समिधा नटावदकर यांची भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. डॉ समिधा यांनी रेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी कामे सुरू केलेली आहेत. ज्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, गरजू रुग्णांना मदत करणे, गरज असलेल्या ठिकाणी अन्नधान्य, वस्त्र वाटप यासारखे अनेक कार्यक्रम घेण्यात येतात. राजकीय क्षेत्रात युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता मोठी आहे. आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचा वापर करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला बलशाली भारत घडविण्याचा, संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्याचा, तसेच भारतीय जनता पार्टीचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करेन असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, भाजपा जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, कायदा आघाडीचे अध्यक्ष महेश माळी, युवा नेते मंदार चौधरी, उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



