*विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत "घन लागवड-दादा लाड कापूस तंत्रज्ञान" शेतदिन नंदुरबार तालुक्यातील कोठडे येथे संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत "घन लागवड-दादा लाड कापूस तंत्रज्ञान" शेतदिन नंदुरबार तालुक्यातील कोठडे येथे संपन्न*
*विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत "घन लागवड-दादा लाड कापूस तंत्रज्ञान" शेतदिन नंदुरबार तालुक्यातील कोठडे येथे संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार द्वारा जिल्ह्यात दादा लाड कापूस तंत्रज्ञानाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, यांच्या माध्यमातून सदर प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि शहादा तालुक्यात घन लागवड-दादा लाड तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. कापूस पिकातील तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी कोठड ता. नंदुरबार येथे शेतदिनाचे आयोजन करण्यात आले होते. शेतदिनाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी गावातील सरपंच मनेश पाडवी, प्रमुख पाहुणे डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त यशपाल पटेल, मंडळ कृषि अधिकारी, ए.टी. पाटील, कृषि विज्ञान केंद्र शाश्रज्ञ पद्माकर कुंदे, सहायक कृषि अधिकारी सौ. आश्विनी वसावे, इंडियन ग्रामीण विकास संस्थाचे धनराज वळवी, युवा मित्र संस्था प्रतिनिधी किरण पाटील, गणेश राजपूत आदि उपस्थित होते.
कार्यक्रमात कापूस प्रकल्पाचे दुर्गाप्रसाद पाटील यांनी जिल्ह्यातील सुरु असलेल्या प्रयोगाची माहिती प्रास्ताविकेतून दिली. शेत दिन कार्यक्रमात पद्माकर कुंदे यांनी दादा लाड कापूस तंत्रज्ञानात गळ फांदी काढणे, शेंडा खुडणी, घन लागवड आणि गुलाबी बोंडअळी करीता एकात्मिक व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. ए.टी पाटील यांनी कृषि विभागा मार्फत राबविल्या जाणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन योजना, कृषी यांत्रिकीकरण, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन आदी विषयी माहिती देऊन योजनांचा उद्देश आधुनिक शेतीला आहे असे प्रतिपादन केले. तसेच धनराज वळवी यांनी गावात सुरु असलेले एकात्मिक शेती व्यवस्थापन विषयी माहिती दिली.शेतदिनाच्या कार्यक्रमानंतर दादा लाड कापूस तंत्रज्ञानात प्रात्यक्षिक केलेल्या राजेंद्र पाडवी क्षेत्राची पाहणी करून पद्माकर कुंदे यांनी अधिक माहिती समजावून सांगितली. तसेच राजेंद्र पाडवी यांनी उपस्थितांसमोर अनुभव कथन केले.
शेतदिन कार्यक्रमात सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संदीप कुवर केले,
शेतदिन कार्यक्रमासाठी मंगरूळ, आर्डीतारा, पावला, कोठडे, वाघशेपा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



