*बोगस इतर मागासवर्ग प्रमाणपत्र देणार्यांची चौकशी करण्याची मागणी, जिल्हाधिकार्यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बोगस इतर मागासवर्ग प्रमाणपत्र देणार्यांची चौकशी करण्याची मागणी, जिल्हाधिकार्यांना निवेदन*
*बोगस इतर मागासवर्ग प्रमाणपत्र देणार्यांची चौकशी करण्याची मागणी, जिल्हाधिकार्यांना निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इतर मागासवर्ग प्रमाणपत्र (ओबीसी) हे चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात येऊ नयेत, अन्यथा याबाबतीत गैरप्रकार झाल्यास किंवा कोणत्याही प्रकारे मूळ मागास प्रतिनिधींच्या हक्क व अधिकारास बाधा पोहोचल्यास यासंबंधी न्यायालयात न्याय मागण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येऊन वेळप्रसंगी विविध प्रकारे आंदोलन उभारण्यात येईल, असा ईशरा ऑल इंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनतर्फे देण्यात आला आहे. तसे निवेदन सहाय्यक उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांना ऑल इंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान यांनी दिले आहे. सध्या नगरपालिका, नगर पंचायत जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या प्रक्रियेत विविध प्रभाग (वॉर्ड) हे इतर मागास प्रवर्ग म्हणजेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. राखीव जागेवर काही प्रतिनिधी चुकीच्या खोट्या कागदपत्र आधारे उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मूळ इतर मागास प्रतिनिधींच्या हक्क आणि अधिकारावर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच साधे प्रतिज्ञापत्र, खोटी वंशावळ प्रमाणपत्र लिहून देणारे दलाल अशा प्रकारांना आळा बसवून संपूर्ण चौकशी शासन निर्णयातील तरतुदीनुसार कागदपत्र तपासून घेऊनच प्रमाणपत्र निर्गमित करावेत. जेणेकरून मूळ इतर मागास प्रवर्गातील प्रतिनिधींवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. याबाबतीत गैरप्रकार झाल्यास किंवा कोणत्याही प्रकारे मूळ मागास प्रतिनिधींच्या हक्क व अधिकारास बाधा पोहोचल्यास यासंबंधी न्यायालयात न्याय मागण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येऊन वेळप्रसंगी विविध प्रकारे आंदोलन उभारण्यात येईल, असा निवेदनाद्वारे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देते प्रसंगी एजाज बागवान, ऍड.शेख मझरुद्दीन, अब्दुल नासीर मन्यार, नाजीमोद्दीन शेख, अजीम बागवान, इंजि.रामकृष्ण मोरे, कुरेशी जुनेद, हाजी आरिफ, अब्दुल वाहिद, निसार अहमद, मोहम्मद युसुफ, दानिश बागवान आदी उपस्थित होते.



