*एम. के. डी. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नंदुरबारचा निखिल वसावे राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एम. के. डी. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नंदुरबारचा निखिल वसावे राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी निवड*
*एम. के. डी. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नंदुरबारचा निखिल वसावे राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नाशिक विभागीय शालेय रोलबॉल स्पर्धेसाठी आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणीतून एम. के. डी. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नंदुरबार येथील विद्यार्थी निखिल नोविंद वसावे (इयत्ता 6 वी) याची राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही निवड चाचणी 12 नोव्हेंबर 2025 रोजी हस्ती पब्लिक स्कूल, दोंडाईचा (धुळे) येथे पार पडली. निखिलने उत्कृष्ट खेळकौशल्य सादर करून कोकमठाण, शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. या विद्यार्थ्यास शाळेचे उत्कृष्ट क्रीडा शिक्षक प्रशांत भगवान शिंदे (रोलबॉल प्रशिक्षक) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा शिक्षक योगेश मोरे आणि चंद्रकांत बारस्कर व जगदीश जाधव यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल संस्थेचे माननीय शुभम किशोर दराडे यांनी निखिलचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सचिन भोंगळे (प्रशासकीय अधिकारी) यांनी देखील विद्यार्थ्याचे कौतुक करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य जीनेश के. यू. यांनी विद्यार्थ्याच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करत सर्व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले आणि निखिलला राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे एम. के. डी. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नंदुरबारचा सन्मान आणि अभिमान संपूर्ण जिल्ह्यात वाढला आहे.



