*विहिरींच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विहिरींच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
*विहिरींच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील आदिवासी वनहक्क दावेदार व शेतकऱ्यांना “बिरसा मुंडा क्रांती योजना” अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींचे अनुदान अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक शेतकरी सभेच्या जिल्हाध्यक्ष कॉ. आर. टी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, संबंधित शेतकऱ्यांनी विहिरींचे बांधकाम व खोदकाम सुमारे सहा ते सात महिन्यांपूर्वी पूर्ण केले असूनही अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर, ट्रॅक्टर व पोकलेनचे खर्च भागविणे अशक्य झाले आहे. अनेक लाभार्थी विधवा महिला असल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचेही नुकसान झाले असून, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसला आहे. शासनाने आदिवासी शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी योजना राबविल्या असल्या तरी, संबंधित विभागांच्या निष्काळजीपणामुळे योजना उपयोगी पडत नाहीत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनात एकूण 20 लाभार्थी शेतकऱ्यांची नावे देण्यात आली असून त्यांचे अनुदान प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सत्यशोधक शेतकरी सभेने या शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ मंजूर करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.



