*नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सीईओ नमन गोयल यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सीईओ नमन गोयल यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेची मागणी*
*नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सीईओ नमन गोयल यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील वाडी, वस्ती पाड्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न दीर्घकाळापासून निकाली न लागल्यामुळे शिक्षक वर्गामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नमन गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या दालनात प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, उप शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी, शालेय पोषण आहार विभाग अधिक्षक भगवान कोलपे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीमती मनिषा पवार, सहाय्यक प्रशासन अधिकारी एस.पी जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व्ही.जी.राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी श्री रमेश गिरी तसेच विविध शिक्षक संघटनांचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते. बैठकीत शिक्षकांच्या सेवासंबंधी प्रलंबित मागण्या, वेतनश्रेणी, बदली प्रक्रिया, मेडिकल बीले, पेसा क्षेत्रातील शिक्षकांचे वेतन विषयक प्रश्न, तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याकरिता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. नमन गोयल तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार भानुदास रोकडे यांना
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्या नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी निवेदन देऊन विविध प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. संघटनेने आपल्या निवेदनात पुढील महत्त्वाचे मुद्दे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी किंवा पदोन्नती घेणाऱ्या शिक्षक-कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. जे.जे. रुग्णालय, मुंबईमार्फत तपासणीचे आदेश दिल्यानंतरही तीन वर्षांनंतरही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. 142 प्रकरणांपैकी फक्त दोन कर्मचारीच बोगस ठरल्याचा सीईओ अहवाल संशयास्पद असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. पारदर्शक चौकशी करून संपूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. पेसा क्षेत्रातील शिक्षकांना नजिकच्या पदोन्नती वेतनश्रेणी पेसा क्षेत्रात कार्यरत प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या मूळ पदाच्या नजिकच्या पदोन्नतीची वेतनश्रेणी (एस-14) अद्याप मंजूर करण्यात आलेली नाही. तातडीने आदेश जारी करून हा लाभ देण्याची मागणी संघटनेने केली आहे. क्रीडा, कला व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन जिल्हा परिषदेने डिसेंबर महिन्यात तालुका व जिल्हास्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी क्रीडा, कला व सांस्कृतिक स्पर्धांचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. बालअमराई शाळेच्या नवीन इमारतीस मंजुरी नवापूर तालुक्यातील बालअमराई जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जी.पी.एफ. हिशेब पावती वितरण 31 मार्च 2025 अखेरचा जी.पी.एफ. हिशेब अद्याप वितरित झालेला नाही. शिक्षकांना पावत्या तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या डिसीपीएस कपात रकमेचे एनपीएस खात्यात वर्गीकरण अद्याप झालेले नाही. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. वरीष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव सन 2023- 24 मध्ये सादर केलेला वरीष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव अद्याप निकाली आलेला नसल्याने त्याची सद्यस्थिती जाहीर करून मंजुरी प्रक्रिया गतीमान करण्याची मागणी करण्यात आली आहे. जीर्ण शाळा व अंगणवाडी इमारती पाडण्याची मागणी नवीन इमारती बांधल्या असूनही अनेक ठिकाणी जीर्ण इमारती शाळेच्या आवारात उभ्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व स्वच्छतेसाठी या इमारती तातडीने पाडून ती जागा खेळाच्या मैदानासाठी विकसित करण्याचे आदेश देण्यात यावेत. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ 3 ऑक्टोबर 2003 च्या शासन निर्णयानुसार अशा शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देणे अपेक्षित असून, जिल्हा परिषद प्रशासनाने याची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सुनील अर्जुन गावित व इतर सहा शिक्षकांना न्याय ग्रामविकास विभागाचे सचिव पो. द. देशमुख यांच्या पत्रानुसार प्रलंबित प्रकरणांवरील कार्यवाही विलंबाने होत असल्याचे नमूद करून संबंधितांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी संबंधित विभागांना प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शिक्षकांच्या समस्या न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली. या बैठकीमुळे प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



