*राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी चावरा स्कूलच्या चेतन वाडीले खेळाडूची निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी चावरा स्कूलच्या चेतन वाडीले खेळाडूची निवड*
*राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी चावरा स्कूलच्या चेतन वाडीले खेळाडूची निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील चावरा स्कूलचा विद्यार्थी चेतन मोहनलाल वाडीले याने विभागस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या 17 वर्षाआतील वयोगटातील ईपी प्रकारात उत्कृष्ट खेळी करीत विजय मिळविला. या खेळाडूची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने भुसावळ येथे विभागस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलचा खेळाडू चेतन मोहनलाल वाडीले याने मुलांच्या 17 वर्षाआतील वयोगटातील ईपी या प्रकारात उत्कृष्ट खेळून विजय मिळविला. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे होणार्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी चेतन वाडीले या खेळाडूची निवड झाली आहे. या यशाबद्दल विजेत्या खेळाडूचा संस्थेचे मुख्याध्यापक फादर टेनी परक्का यांनी सत्कार केला. खेळाडूला क्रीडाशिक्षक डॉ. दिनेश बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले.



