*नायगांव तालुका शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक संपन्न, निवडणुका जिंकण्यासाठी भक्कम नेतृत्वाची गरज असते-भास्करराव खतगावकर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नायगांव तालुका शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक संपन्न, निवडणुका जिंकण्यासाठी भक्कम नेतृत्वाची गरज असते-भास्करराव खतगावकर*
*नायगांव तालुका शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक संपन्न, निवडणुका जिंकण्यासाठी भक्कम नेतृत्वाची गरज असते-भास्करराव खतगावकर*
नायगांव(प्रतिनिधी):-कोणत्याही निवडणुका जिंकण्यासाठी आपल्याला भक्कम नेतृत्वाची गरज असते त्यानुसार आज घडीला राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे खंबीर नेतृत्व आपल्या सोबत आहे ते फुले शाहू आंबेडकरी विचारधारा सोबत घेऊन सक्षमपणे कार्य करीत आहेत त्यामुळे आपण आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवून दाखवू असा आत्मविश्वास माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केला. काल 1 ऑक्टोबर शनिवार रोजी नायगांव तालुका शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) आढावा बैठक तसेच दिपवाळीनिमित्त स्नेहभोजन कार्यक्रम झाला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते, तर
माजी आ. मोहन हंबर्डे, सुभाष साबणे, शिवराज पा. होटाळकर, व्यंकटराव गोजेगावकर, अशोक पा. मुगावकर, भाउसाहेब गोरठेकर, शिरीष गोरठेकर, कैलास गोरठेकर, वसंत सुगावे, सुनिल एंबडवार, विक्रम देशमुख, राम पा. बन्नाळीकर, अंकूश देशाई , विनायक शिंदे, श्रीपत शिंदे, सोनाली हंबर्डे, भाग्यश्री गायकवाड, शिवराज गाडीवान, दिपक पा. चोळाखेकर, सुधाकर देशमुख, अनिकेत देशमुख, मारोती वाडेकर, भिमराव जेठे, उत्तम गवाले आदींची प्रमुख उपस्थीती होती. पुढे बोलताना भास्करराव खतगावकर म्हणाले की मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक निवडणुका जिंकल्या माझे नेते भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण होते असे सांगून आ. प्रतापराव चिखलीकर यांना म्हणाले की, प्रतापराव एकेकाळी तुमचे नेते पण अशोकराव चव्हाण होते पण तुम्ही नंतर एकटे बाजूला इतर पक्षात जावून अनेक निवडणुका जिंकलात हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे हे दुसऱ्यांना जमत नाही असे म्हणताच उपस्थित जनसमुदायात जोरदार हास्य पिकला, आपले नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भक्कम नेतृत्व आहे मी जेव्हा प्रवेश केला त्यावेळेस आपल्या भागातील मानार धरणाची उंची वाढवण्याच्या कामाचा प्रश्न त्यांच्याकडे मांडला होता ते काम आज सुरू झाले ही अभिमानाची गोष्ट आहे अजित पवार एक प्रगल्भ नेतृत्व आहे त्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला प्रशासनावर त्यांची पकड मजबूत आहे त्यामुळे पुढील निवडणुका जिंकण्यासाठी आपण आजपासूनच कामाला लागले पाहीजे असे नमुद केले. स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी आहे. आ. प्रतापराव चिखलीकर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात युती झाली नाही तर सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करून स्वबळावर निवडणुका लढविण्याची आमची तयारी आहे आपल्या सोबत राज्यात अजित पवार यांचे नेतृत्व आणि नांदेड जिल्ह्यात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचं नेतृत्व आपल्या सोबत आहे असे मत आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या आढावा बैठकीचे संयोजक नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील वडाळकर यांनी केले असून त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कुंटूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या दृष्टिकोनातून कुंटूर गटातील अनेक गावांत जाऊन लोकांचे मत जाणून घेत असून या निवडणुकीला जनतेच्या पाठबळावर सक्षमपणे सामोरे जाईन असा आत्मविश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी कुंटूर बरबडा मांजरम नरसी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपत शिंदे मांजरमकर यांनी केले.



