*प्रतिकूल वातावरणातही प्रिवी लाईफ सायन्सेस कंपनीच्या उत्पादनांमुळे पपई पिकात भास्कर पाटील यांचे उल्लेखनीय यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रतिकूल वातावरणातही प्रिवी लाईफ सायन्सेस कंपनीच्या उत्पादनांमुळे पपई पिकात भास्कर पाटील यांचे उल्लेखनीय यश*
*प्रतिकूल वातावरणातही प्रिवी लाईफ सायन्सेस कंपनीच्या उत्पादनांमुळे पपई पिकात भास्कर पाटील यांचे उल्लेखनीय यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-या हंगामात हवामानातील अनियमितता, वारंवार पाऊस व ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी पपई पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील होळ गावचे प्रगतशील शेतकरी भास्कर पाटील यांनी पिकाचे योग्य नियोजन करून प्रिवी कंपनीच्या दर्जेदार उत्पादनांच्या मदतीने उत्कृष्ट यश मिळवले आहे. पाटील यांनी सुरुवातीपासूनच पपई पिकात प्रिवी लाईफ सायन्सेस कंपनीचे प्रिवीट रेंज (सूक्ष्म अन्नदर्वे, व्हिटॅमिन, अमिनो ऍसिड व सिलिकॉन युक्त), प्रोमोसा, Silixol, Nutrifight, geoxol व calsib असे सर्व प्रॉडक्ट वापरले. यामुळे झाडांची वाढ मजबूत झाली, फुलधारणा दाट झाली व फळांची सेटिंग अत्यंत समाधानकारक दिसून आली. आज त्यांच्या शेतातील पपई झाडांवर मोठ्या आकाराची, दर्जेदार आणि आकर्षक फळे लटकलेली आहेत. पिकाची वाढ आणि फळांचा दर्जा पाहून परिसरातील इतर शेतकरी प्रभावित झाले आहेत.भास्कर पाटील सांगतात. “या वर्षी वातावरण खूपच प्रतिकूल होते, पण मी प्रिवी कंपनीची सर्व उत्पादने सातत्याने वापरली. परिणामी पपई पिकाची सेटिंग जबरदस्त झाली आणि फळांची साईझही उत्तम मिळाली. या यशाचे मोठे श्रेय कंपनी प्रतिनिधी विजय पाटील यांना जाते. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर योग्य सल्ला दिला आणि त्या मार्गदर्शनामुळे मला हे यश मिळाले.” शेतकरी भास्कर पाटील यांच्या शेतात सध्या पपई पिकाची वाढ, फळांची एकसारखी साईझ व दर्जा पाहून सर्वत्र कौतुक होत आहे. प्रिवी कंपनी नेहमीच शेतकऱ्यांच्या विश्वासाला उतरून दर्जेदार खत उत्पादने व वैज्ञानिक मार्गदर्शन देत असते. प्रतिकूल हवामानातही उत्तम उत्पादन घेऊन भास्कर पाटील यांनी दाखवून दिले की योग्य नियोजन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने वापरल्यास यश निश्चित आहे.



