*डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालय कोकणीपाडा या विद्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालय कोकणीपाडा या विद्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेचे आयोजन*
*डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालय कोकणीपाडा या विद्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालय कोकणीपाडा येथे फेमिना क्लब कडून सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमध्ये दोन वयोगटातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता विद्यार्थ्यांच्या भाषणाचा दर्जा ऐकून आम्ही सगळे जण खूपच प्रभावित झालो. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना पेन,कंपास बॉक्स, रायटिंग पॅड, चित्रकला साहित्य अशी बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यातील एका विद्यार्थ्याला वाचनाची आवड आहे असे कळल्यावर जीएसटी कोऑर्डिनेटर सुप्रिया कोतवाल यांनी त्या विद्यार्थ्याला रोख 201 रु पुस्तक घेण्यासाठी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक जितेश शर्मा यांनी अतिशय सुंदरपणे केले तसेच प्रास्ताविक लायन दिपा वाडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यपाक राजेश गांगुर्डे होते, आभार जितेंद्र गिरासे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीतल वसावे, कीर्तीवर्धन तायडे, महेंद्र चौरे, योगेश कोकणी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्वांचे सहकार्य लाभले. अतिशय निसर्गरम्य अश्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.



