*दुधाळ गाईंच्या लाभावरून आदिवासींमध्ये संताप, तळोद्यात 16 जून रोजी रास्ता रोको आंदोलन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दुधाळ गाईंच्या लाभावरून आदिवासींमध्ये संताप, तळोद्यात 16 जून रोजी रास्ता रोको आंदोलन*
*दुधाळ गाईंच्या लाभावरून आदिवासींमध्ये संताप, तळोद्यात 16 जून रोजी रास्ता रोको आंदोलन*
तळोदा(प्रतिनिधी):–विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना देण्यात येणाऱ्या दोन दुधाळ गाईंच्या निवडीमध्ये अनावश्यक विलंब व टाळाटाळ केल्याने आदिवासी लाभार्थ्यांमध्ये संतापाचा सुर झाले आहेत. या अन्यायाविरोधात एकलव्य आदिवासी युवा संघटना आणि वंचित लाभार्थी यांच्या वतीने दिनांक 16 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता ब्राह्मणपुर- अंकलेश्वर हायवेवरील तळोदा बायपास, चिनोदा चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा उद्देश म्हणजे आदिवासी विकास विभाग, प्रकल्प कार्यालय तळोदा यांच्याकडून लाभार्थ्यांना गायींचा लाभ तत्काळ वितरित करण्यासाठी दबाव निर्माण करणे हा आहे. संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, पात्र महिलांची निवड झाल्यानंतरही योजनेंतर्गत लाभ वितरण करण्यात जाणूनबुजून दिरंगाई केली जात आहे, जो एकप्रकारे आदिवासी महिलांचा अवमान आहे.