*नं.ता.वि.स.जी टी पाटील महाविद्यालयात स्वर्गीय गजमल तुळशीराम पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नं.ता.वि.स.जी टी पाटील महाविद्यालयात स्वर्गीय गजमल तुळशीराम पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
*नं.ता.वि.स.जी टी पाटील महाविद्यालयात स्वर्गीय गजमल तुळशीराम पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार तालुका विधायक समितीच्या जी टी पाटील महाविद्यालयात स्वर्गीय गजमल तुळशीराम पाटील यांच्या जयंतीचा उत्सव संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन व प्रसिद्ध उद्योगपती मनोज रघुवंशी, संस्थेचे सरचिटणीस यशवंत देवराम पाटील, तसेच संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य यशवर्धन रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यापीठ सदस्य डॉ. महेंद्र रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ एम एस रघुवंशी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस. यु. पाटील, उपप्राचार्य डॉ संदीप पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा टी. जी. पाटील, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. डी. चौधरी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नंदा वसावे, यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बापूजींच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध शाखांचे, विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व प्राध्यापिका, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती पुण्यतिथी उत्सवाचे समिती प्रमुख प्रा. डॉ. उपेंद्र धगधगे, डॉ धनंजय पाटील, प्रा.डॉ. मनोज शेवाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले त्यांना प्रा.एन. आर. कोळपकर प्रा. हर्षबोध बैसाणे व प्रा वैशाली मराठे यांचे सहकार्य लाभले.